सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोडती पद्धतीने कामाचे वाटप करण्यात येणार असून यासाठी कामवाटप समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 9 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 गोंदिया यांच्या कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे. असे आव्हान करण्यात आले आहे.