हिंगणघाट: जाम व मेणखात येथील गावकऱ्यांचा सोलर कंपनीविरोधात रास्ता रोको आंदोलन:तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी
जाम आणि मेणखात या मौज्यांमध्ये सुरू असलेल्या रवींद्र एनर्जी सोलर कंपनीच्या कामामुळे गावातील मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कंपनीच्या ओव्हरलोडेड गाड्यांमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला आहे.यामुळे सोलर कंपनीविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या खराब रस्त्यांमुळे अनेक ग्रामस्थांचे अपघात होऊन त्यांना दुखापती झाल्या आहेत. वाहन चालक आणि शालेय विद्यार्थी यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.