जालना: दिवाळी दसर्यापर्यंत महागाईवर नियंत्रण मिळवा; आपले सरकार हिंदुत्वाचे आहे तर मग बंधुत्व कधी पाळणार: सौ. रसना देहेडकर
Jalna, Jalna | Sep 19, 2025 राज्यात महागाईने कहर केला असून सर्वसामान्यांचे जगने अवघड झाले आहे. गरीबांना शिधा दिला जातो, श्रीमंताना त्याची गरज नाही. परंतु, मध्यमवर्गीय मात्र त्यात पिचून निघूत आहे. त्यांनी कुठे जायचं? आपले सरकार हे हिंदुत्वाचे आहे, तर मग बंधुत्व धरी कधी निभावणार असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केला. शुक्रवार दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दिले असून जिहाधिकारी यांना देखील निवेदन दिले आहे.