नांदुरा: कारच्या धडकेत दुचाकीस्वार मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मलकापूर- नांदुरा दरम्यान असलेल्या पिंपळखुटा धांडे फाट्याजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना २४ ऑक्टोबरला दुपारी २.३० वाजता घडली.याबाबत नामदेव नारायण मानकर रा. खातखेड यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की.तक्रारीवरून त्या कार चालकावर भारतीय न्याय साहित्य २८१,१०६(१),३२४(४) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.