बांद्रा भारत नगर झोपडपट्टी धारकांच्या न्यायासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा
आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजता च्या सुमारास मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष नितीन कांबळे यांनी बांद्रा पूर्व भारत नगर झोपडपट्टी धारकांच्या न्यायासाठी उद्या बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला जाणारा असून म्हाडा एस आर ए बिल्डर यांच्या संगणमताने झोपडपट्टी धारकांना बेवारस केलं जात आहे त्यांच्या न्यायासाठी हा मोर्चा असल्याचे नितीन कांबळे म्हणाले.