मलकापूर: भालेगाव रोडवर रेल्वे ब्रिजजवळ ट्रक केला लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मलकापूर शहरातील भालेगाव रोडवर रेल्वे ब्रिजजवळ उभा असलेला ट्रक अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी घडली आहे.मलकापूर शहरातील शेख बशीर शेख नसीरत्यांच्या मालकीचा ट्रक क्र. एमएच १८-एपी ७०९५ हा ट्रक भालेगाव रोडवरील रेल्वे पुलाजवळ उभा केला होता.सदर ट्रक आढळून आला नाही ट्रकचा शोध घेतला परंतु कुठेच मिळून आला नाही.याप्रकरणी शेख वहीद शेख सलीम यांनी १५ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.