आर्णी: दतरमपूर येथे भरधाव दुचाकीचा झाला अपघात; दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी
Arni, Yavatmal | Sep 17, 2025 नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील आर्णी शहरातील दत्तरामपूर आलेल्या अर्धवट व खड्डेमय रस्त्यामुळे दुचाकीचां अपघातात झाल्याची घटना आज दिनाक 17 सप्टेंबर ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे यामध्ये दोन दुचाकीस्वार जखमी झाले. यवतमाळवरून आर्णीमार्गे मोखकडे जात असताना हा अपघात झाला. जखमींची नावे पंकज पहुल व अंकुश आडे अशी असून, दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.