कन्नड: आमदार फंड शून्य, निवडणुकांसाठी पैसे नाही, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राज्य सरकारवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल
राज्य सरकारकडून वर्ष उलटून गेले तरी महाराष्ट्रातील एकाही आमदाराला आमदार निधी देण्यात आलेला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सरकारकडे पैशांची टंचाई असल्याने पोलिस भरतीचे फॉर्मसुद्धा मुलांकडून भरवले जात असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणांविरोधात उद्या ता. 2दत्त मंदिर, कन्नड येथे भारतीय जनतेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.