धरणगाव: गणाबाप्पा नगरात बंद घर फोडून १ लाख ४८ हजारांचा ऐवज लांबविला; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
धरणगाव शहरातील गणाबाप्पा नगरात एकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ४८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता समोर आली. याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.