कन्नड: संतचरणांचा स्पर्श आणि अध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती — आमदार संजना जाधव पादुका दर्शन सोहळ्यात भावविभोर
आज नंद्राबाद (ता. खुलताबाद) येथे रामानंद संप्रदायाच्या वतीने परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य सोहळ्याला आमदार संजना जाधव उपस्थित राहिल्या. कार्यक्रमात भक्तीभावाने ओतप्रोत वातावरण निर्माण झाले होते. आमदार जाधव यांनी पादुकांचे दर्शन घेत नतमस्तक होत संतचरणांचा स्पर्श अनुभवला. या प्रसंगी त्यांना अंतःकरणातून शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती झाली.