खुलताबाद: रासायनिक खतांच्या भाववाढीविरोधात सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांचा एल्गार, तहसीलदारांना निवेदन
१ नोव्हेंबरपासून रासायनिक खतांच्या दरांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. रब्बी हंगामातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने दिलेली दिवाळीपूर्वी मदतीची आश्वासने फोल ठरली आहेत. दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही. वाढलेल्या खतांच्या दरामुळे आधीच कर्जबाजारी शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.