नाशिकरोड येथील देवळालीगाव परिसरातील रोकडोबावाडी येथे पहाटे एकच्या सुमारास दहशतीची घटना घडली. वैभव पवार व त्याच्या तीन साथीदारांनी कोयता हातात घेऊन घरांवर दगडफेक व दरवाजांवर कोयत्याने वार करत नुकसान केल्याचा आरोप आहे. या घटनेत ऑटो रिक्षाची काच फोडण्यात आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी गौतम थोरात यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.