नेवासा: अल्पवयीन मुलीस त्रास देणाऱ्या आरोपीला ठोठावली शिक्षा
अल्पवयीन मुलीला वारंवार हातवारे करून त्रास देणाऱ्या आरोपीला तिच्या वडिलांनी समजावून सांगितले, पण त्याने ऐकले नाही. त्यानंतर त्याच्यावर २०२३ मध्ये पोक्सो अंतर्गत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीवर हातवारे केल्याबद्दल नेवासा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून तुरुंग व दंड ठोठावला.