तालुक्यातील पेंढरी शिवारात बुधवारी दुपारी रानगव्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका २९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यातून महिलेला वाचवण्यासाठी धावलेली १६ वर्षीय तरुणीदेखील रानगव्याच्या धडकेत गंभीर जखमी झाली आहे. या थरारक घटनेमुळे पेंढरी परिसरात भीतीसोबतच वनविभागाच्या दिरंगाईविरोधात संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा विकेश धुर्वे (२९) आणि निशा केशव इवनाती (१६, रा. मध्य प्रदेश)