अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंजिरे वाजवत शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन, सातबारा कोरा, कर्जमाफी आणि हमीभाव साठी आंदोलन
Akola, Akola | Dec 1, 2025 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंजिरे वाजवत अनोखे आंदोलन उभारले. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पारंपरिक ग्रामीण पद्धतीने मंजिरे वाजवत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी परिसरात घोषणांचा आवाज घुमत होता.शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना सर्वसमावेशक कर्जमाफी द्यावी, तसेच यंदाच्या हंगामातील प्रमुख पिकांना योग्य व हमीभाव द्यावा. सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये तर कापसाला 10,000 रुपये भाव द्यावा.