हिंगणा: उकळी रोड येथील गाडीवरून नियंत्रण सुटल्याने नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू
Hingna, Nagpur | Jan 11, 2026 पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत उकळी रोड,नाल्याजवळून सौरभ अरूण डंभारे, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १२, कटरे ले-आऊट, हे त्याचा मित्र नामे तेजस धनराज मरसकोल्हे, वय २३ वर्षे याचेसह त्याचे स्प्लेंडर दुचाकी क. एम.एच. ४० सि.एल. ८९४१ ने जात असता, गाडीचा वेग जास्त असल्याने टर्निंगवर वळण घेतांना त्याचे संतुलन जावून दोघेही गाडीसह नाल्यामध्ये खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता ग्रामिण रूग्णालय हिंगणा येथे नेले असता सौरभ यास मृत घोषित केले.