गोरेगाव: अखेर ठरले! अजय कोठेवार गोरेगाव नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एनएसयूआय पासून युवक काँग्रेस पर्यंत निष्ठेने पक्षाकरिता काम करणारे गोरेगाव येथील मृदभाषी मिलनसार व्यक्तिमत्व असलेले अजय कोठेवार यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या गोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोठेवार हे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार राहणार असल्याने एकच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोठेवार यांनी याकरिता आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे.