हिंगणघाट: शहरातील बाजार समितीत यंदा पहिल्यांदाच विराजमान झालेल्या मस्कऱ्या गणपतीचे मिरवणूक काढून जल्लोष विसर्जन
हिंगणघाट बाजार समितीच्या कार्यालयात यंदा पहिल्यांदाच विराजमान झालेल्या मस्कऱ्या गणपतीचे अतिशय जल्लोषात वाजंत्री फटाक्यांची आतिषबाजी करीत धुमधडाक्यात विसर्जन करण्यात आले यावेळी बाजार समितीचे सभापती ॲड सुधीरबाबु कोठारी उपसभापती, हरीशभाऊ वडतकर, जेष्ठ संचालक मधुकरराव डंभारे, उत्तमरावजी भोयर, प्रफुल्लभाऊ बाडे, ओमप्रकाशजी डालिया, राजुभाऊ मंगेकर, संजयभाऊ कातरे,डॉ निर्मेशजी कोठारी माजी नगरसेवक दिपक माडे बाजार समितीच्या सर्व कर्मचारी वृंदावनी दहा दिवस विधीवत पुजा अर्चनेत सहभाग घेतला होता.