लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून एका ३९ वर्षीय तरुणाला तब्बल १० लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वधू आणि तिच्या कुटुंबासह एकूण सात जणांविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात फसवणूक, धमकी आणि अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभय अरुणराव खोडसकर (वय ३९, रा. सारडा संकुल, बीड) यांनी तक्रार दिली आहे. लग्न जमत नसल्यामुळे ते मानसिक तणावात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत, रामकृष्ण उपाध्ये, रजनी उपाध्ये, उदय उपाध्ये,