वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथे वीरभद्र महाराज यात्रा महोत्सव मंगळवार तारीख सहा जानेवारी रोजी पासून सुरू झाला दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या उत्सवा दरम्यान बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. यात्रा मंगळवार ते बुधवार तारीख सात पर्यंत आयोजित करण्यात आली होती दरम्यान बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एवढ्या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.