धुळे: बुद्धगया, महू, दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्धांना द्या; भारतीय बौद्ध महासभेची मागणी, जिल्हाधिकारी कार्याबाहेर आंदोलन
Dhule, Dhule | Sep 17, 2025 धुळे येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली विविध बौद्ध-आंबेडकरी संघटनांनी जनआक्रोश आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य सरकारकडे निवेदन दिले. यात बोधगया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे, महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थळ स्मारक ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’कडे हस्तांतरित करावे व नागपूर दीक्षाभूमीवरील अतिक्रमण हटवावे, अशा मागण्या करण्यात आल्या.