दि.5 डिसेंबर रोजी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान रामपुरी येथे फिर्यादी हंसलाल अगारे हे आपल्या पत्नीच्या घरी पैसे व त्यांच्या कडील दागिने मागण्यास आले असता यातील आरोपी चंद्रकुमार शहारे यांनी त्याच्यासोबत भांडण करून शिवीगाळ करून व आडजात काठीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटावर तसेच डाव्या कपाळाजवळ व खांद्यावर बासाच्या काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसात दि.5 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.