कोपरगाव: दिवाळी -भाऊबीज पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात गर्दी शहर पोलिसांकडून सुरक्षितेच्या दृष्टीने उपाय योजना
भाऊबीज व दिवाळीमुळे कोपरगाव बस स्थानक परिसरात मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने कोपरगाव शहर पोलिसांकडून या ठिकाणी आज २३ ऑक्टोबर तोजी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.यावेळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी नागरिकांना सावधानतेचा आव्हान केला आहे दिवाळी व भाऊबीज निमित्ताने गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे बसमध्ये गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानक परिसरातही प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.