लातूर --लातूर पथकात ९ डिसेंबर २०२5 ते १६ डिसेंबर २०२5 या कालावधीत होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. विविध जनसेवा उपक्रमांच्या माध्यमातून होमगार्ड दलाचा ७९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांसाठी माननीय जिल्हा होमगार्ड समादेशक श्री मंगेश चव्हाण, केंद्रनायक श्री एकनाथ सुतार, प्रशासकीय अधिकारी देव साहेब, तालुका समादेशक (लातूर पथक) श्री विजयकुमार आडे, कंपनी नायक जी. डी. सूर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.