गोरेगाव: सेवा पंधरवडा "तून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहचणार ''सर्वांसाठी घरे' आणि 'नावीन्यपूर्ण उपक्रम' राबवविणार
महसूल विभागातर्फे १७ सप्टेंबर ( पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस) ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधीजी जन्मदिवस), २०२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत "सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवत या पंधरवड्यात शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहचिण्याच्या उद्देशाने करावयाची सर्व कामे वेळेवर आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी चे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची निर्देश शासनाने दिले आहे.