हिंगणघाट: शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या कमी दरात खरेदीमुळे उसळला शेतकऱ्यांचा संताप
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतकऱ्यांचा प्रचंड संताप उसळला. खुल्या बाजारातील कापसाच्या दरावरून आणि सीसीआयच्या खरेदी प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे शेतकरी आक्रमक झाले. अति पावसामुळे कापूस ओलाव्याच्या विळख्यात सापडल्याने त्याची प्रत घसरली असून, अनेक शेतकऱ्यांच्या मालातील ओलाव्याचे प्रमाण २० ते २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत सीसीआयने खरेदीसाठी ओलाव्याची मर्यादा केवळ ८ ते १२ टक्के ठेवली असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.