धरणगाव: धरणगावात वर्षभरापासून वास्तव्यास असलेल्या 'इराणी' महिलेचा पर्दाफाश; पोलीसांनी घेतले ताब्यात
धरणगाव शहरात इराणी महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे राहत असतांना महिलेच्या पतीचा खून करण्यात आला होता. त्यामुळे ती महिला घाबरून ही आपल्या मुलासह धरणगाव शहरात गेल्या वर्षभरापासून राहत होत्या. दरम्यान, धरणगाव पोलीसांनी तिला ताब्यात घेतले असून तिला तिच्या मायदेशी पाठविण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता दिली आहे.