बुलढाणा: निमगाव गुरु येथे बहिणीला संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा देऊन साजरी केली अनोखी भावबीज
बुलढाणा जिल्ह्याच्या निमगाव गुरु येथील संतोष व अरुण धारे या दोन्ही भावांनी आज 23 ऑक्टोबर रोजी सकाळी भाऊबीज निमीत्ताने बहीण सुनिता भालेकर यांना संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा भेट देऊन अभिनव भाऊबीज साजरी केली आहे संतोष धारे हे शासकीय कर्मचारी आहेत. ते हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून मागील 5 वर्षांपासून संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमा फ्रेम करून इतरांना भेट देतात.आतापर्यंत त्यांनी 100 पेक्षा जास्त संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमा इतरांना भेट दिल्या आहेत.