सेलू: बोरी, हिंगणी, वानरविहिरा व सुरगाव शिवारात गावठी दारू भट्टीवर सेलू पोलिसांची कारवाई, ₹44850 चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Oct 12, 2025 जंगलव्याप्त भागात गावठी दारूच्या रनिंग भट्टीवर महिला मंडळाच्या सोबत पोलिसांनी छापा टाकून गावठी मोहा दारूच्या भट्टया उध्वस्त केल्या. ही कारवाई ता. 12 रविवारी दुपारी 4 वाजताचे सुमारास बोरी, हिंगणी, वानरविहिरा व सुरगाव शिवारात सेलू पोलिसांनी केली. यात गावठी मोहा दारुसह 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींवर सायंकाळी 6.30 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.