नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर बोरवठ फाटा नजिक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी जखमी इसमास करंजाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.