वाशिम: जयस्तंभ चौक कारंजा येथे अपघातात युवक जखमी
Washim, Washim | Mar 9, 2025 जयस्तंभ चौक कारंजा येथे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामध्ये दुचाकी वाहन अडकून पडल्यामुळे दि. 9 मार्च रोजी दु. 1 वाजताच्या दरम्यान अपघात होऊन एक युवक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. सदर रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून रस्त्यामध्ये ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नसल्यामुळे सदर अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.