नेवासा: कार चा बर्निंग थरार ; वाहन चालकांसह प्रवाशांमध्ये घबराट
अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील वडाळा बहिरोबा येथे खारा गोडा पुलाच्या जवळ हुंदाई पेट्रोल कार जळून खाक झाली आहे. अहिल्यानगर वरून संभाजीनगरकडे जात असताना गाडीच्या बोनेट मधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर गाडी चालकाने रस्त्याच्या कडेलाकार उभी करून खाली उतरत असतानाच आगीचा भडका उडून गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले