नवापूर: बोदवड गावाजवळ भीषण अपघात , तरुणाचा जागीच मृत्यू
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोदवड गावाजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक तरुण दिनकर वसावे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागेस मृत्यू झाला. घटनास्थळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथक घटनास्थळी दाखल झाले.