रामटेक: मनसर येथे एकदिवसीय शिक्षण परिषद संपन्न
Ramtek, Nagpur | Sep 24, 2025 रामटेक पंचायत समिती केंद्र मनसर अंतर्गत शिक्षकांची एक दिवसीय शिक्षण परिषद बुधवार दिनांक 24 सप्टेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी साडेचार वाजता पर्यंत राष्ट्रीय आदर्श विद्यालय मनसर येथे संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे आयोजन तसेच प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रकाश महल्ले यांनी केले. शिक्षकांना त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.