13 मार्चला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन नागपुरात घडले आहे. लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये एका वृद्ध व्यक्तीला मिळालेल्या मदतीमुळे "खाकीतही देव माणूस असतो" याची प्रचिती नागरिकांना आली.मिळालेल्या माहितीनुसार, एक वृद्ध गृहस्थ आपली तक्रार घेऊन लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये आले होते. वाढलेले वय आणि अशक्तपणामुळे त्यांना चालताना कसरत करावी लागत होती. आपले काम आटोपल्यानंतर