मुर्तीजापूर: शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भारतीय किसान संघ आक्रमक मुख्यमंत्री महोदय,आमदार,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांना निवेदन
पावसाने प्रचंड प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक अडचण झाली असून पिकांचे नुकसान,विमा योजना,वन्य प्राण्यांचा त्रास आणि शेतमालाला योग्य हमीभाव नसल्याने तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी तथा अशा अनेक मागण्यांची पुर्तता व्हावी यासाठी भारतीय किसान संघ प्रांत विदर्भाच्या वतीने मुख्यमंत्री महोदय,आमदार,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांना विदर्भ उपाध्यक्ष राहुल राठी यांच्यासह शेतकरी बांधवांनी शुक्रवार २६ सप्टेंबर दुपारी १ वाजता निवेदन दिले.