मौदा: सामुदायिक भवन धामणगाव येथे वार्षीक सर्वसाधारण सभेचे आयोजन
Mauda, Nagpur | Sep 28, 2025 ग्रामीण भागात असलेल्या सामुदायिक भवन धामणगाव येथे सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ची वार्षीक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले .सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन व जमाखर्च वाचून दाखविण्यात आला. सभासदांनी सदर अहवाल व जमाखर्च एकमताने मंजूर केला. सभासदांनी संस्थेत जास्तीत जास्त व्याव्हार करावे असे आवाहन करण्यात आले. संस्थेला अ वर्ग ऑडीट मिळाला आहे. असे सभेतसभासदांना सांगण्यात आले.