खेड: चाकण येथे कोयत्याने वार करत खुणाचा प्रयत्न
चाकण परिसरात ऍम्ब्युलन्स चालवण्यासाठी एका ऍम्ब्युलन्ससाठी महिन्याला पाच हजार रुपये खंडणी देण्याची मागणी करत पाच जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका कारची तोडफोड करत कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (३ नोव्हेंबर) रात्री खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.