राहुरी व श्रीरामपूर या दोन तालुक्यांना वरदान ठरलेल्या प्रवरा नदीपात्रात परिसरातील साखर कारखान्याने मळीमिश्रीत पाणी सोडल्याने नदीपात्रातील संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नदीपात्रातील माशासह वन्यजीव देखील मृत्युमुखी पडत आहेत तसेच मेंढपाळांच्या मेंढ्या काही शेऴ्या, मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा कारखान्यासमोर धरणे आंदोलन धरणे जाईल असा पवित्रा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.