बुलढाणा: खालिद बिन वलीद नगर आणि बालाजी नगरवासी निवडणुकीवर टाकणार बहिष्कार, जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा
बुलढाणा शहरातील प्रभाग क्र 1 मधील खालिद बिन वलीद नगर आणि बालाजी नगर येथील नागरिकांना नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांनी आगामी नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आज 28 ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदनात दिला आहे.