नाशिक ते छ.संभाजीनगर शिवशाही बसला गळती व्हिडिओ करत कोट्यावधी रुपयांच्या खर्चावर प्रवाशाचा सवाल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
आज दि 16 सप्टेंबर सकाळी 4 वाजता राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शिवशाही बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.नाशिक ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्या शिवशाही बस मधील प्रवाशांना बसमधील पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे गैरसोईला वाढ सामोरे जावे लागले. पावसाच्या पाण्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी देखील जागा नव्हती. या संपूर्ण प्रकाराचा प्रवासी आनंद मगरे यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करत कोट्यावधी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.