उदगीर: उदगीर नगरपरिषद निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी सदस्य पदाची आरक्षण सोडत
Udgir, Latur | Oct 6, 2025 येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार असून उदगीर, नगरपरिषद आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. उदगीर नगरपरिषद सदस्य पदाची आरक्षण सोडत उदगीर नगरपरिषद सभागृहात,होणार आहे आरक्षण सोडतीसाठी उदगीरचे उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून ६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे