आंबेगाव: अवसरी बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गर्भवतीचा बाळासह मृत्यू
Ambegaon, Pune | Oct 7, 2025 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे बागल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गर्भवती स्वीटी अक्षय बागल (वय 27) हिचा बिबट्या पाहिल्यानंतर झालेल्या भीतीमुळे आणि रक्तदाब वाढल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूपूर्वीच तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.