कोळवण-वाळेण-डोंगरगाव या गावांना जोडणारा पाटबंधारे विभागाने सुमारे चाळीस वर्षापूर्वी उभारलेला कोल्हापूर पद्धतीचा पूल गुरुवारी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता तोडण्यात आला. त्यामुळे कोळवणपासून पुढे डोंगरगाव गावठाण व वाळेण या गावांचा रस्ते संपर्क पूर्णतः तुटला असून शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुग्धव्यवसायिक व शेतमाल वाहतूक करणाऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.