जिल्ह्यातील देवळी येथील मारिया इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी यश राजू राठोड याने कुस्ती या पारंपरिक खेळात उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने नागपूर येथे विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात यश राठोड याने प्रभावी खेळ करत अंतिम सामन्यात विजय मिळवला. या यशाबद्दल ता. ५ शुक्रवाराला दुपारी २ वाजता त्याचे घरी जाऊन अभिनंदन करण्यात आले.