सेनगाव: कामगार कल्याण विभागाच्या वतीने जांभरून रोडगे येथे आरोग्य तपासणी शिबिर,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे या ठिकाणी आज कामगार कल्याण विभागाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला़. हिंगोली जिल्ह्यांमध्ये बांधकाम कल्याण कामगार कल्याण विभागाच्या वतीने तपासणी शिबिर राबवून मार्गदर्शन करण्यात येत असून त्या अनुषंगाने जांभरून रोडगे या ठिकाणी आज हे शिबिर राबविण्यात आले यावेळी जनप्रहार बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णू मुटकुळे यांनी भेट दिली.