गोंदिया: महर्षी सुदर्शन महाराज जयंती निमित्त गोंदिया शहरातील सावरटोली चौकातून भव्य बाईक रॅलीचे आयोजन
आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 ते 12 वाजेच्या दरम्यान गोंदिया शहरातील विविध भागातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बाईक रॅली सावरटोली चौकातून काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित झाले होते. यावेळी महर्षी सुदर्शन महाराज यांच्या जयघोषाने सारे शहर दुमदुमले होते. या बाईक रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने युवा सहभागी झाले होते.