नागपूर शहराकडे भरधाव वेगाने जाणारी राज्यमार्ग परिवहन महामंडळाची एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाची नियंत्रण सुटले आणि शिवाजी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये ही एसटी थेट घुसली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही हा विचित्र अपघात 13 डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास घडला. इमामवाडा आगाराची बस ही नागपूर शहराकडे भरता वेगाने जात असताना मोंढा गावाजवळ या बसचे ब्रेक फेल झाले.