जिल्ह्यात सध्या 'ॲग्रीस्टॉक' अंतर्गत शेतकऱ्यांना युनिक ओळख क्रमांक देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फार्मर आयडी तयार करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यास महसूल विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत असून, अनेक तहसीलदार सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या कर्तव्यासाठी जिल्ह्याबाहेर असल्याने दुरुस्तीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.