लाखनी: वंदे मातरमची दीडशे वर्षे : लाखनी समर्थ पटांगणावर सामूहिक वंदे मातरम गान
लाखनी येथील समर्थ पटांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) लाखनी, तसेच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या ओढीने वंदे मातरमचे स्वर गगनात झंकारले. परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला. या सामूहिक गानाद्वारे भारतमातेप्रती निष्ठा आणि अभिमानाचा संदेश देण्यात आला.